• A
  • A
  • A
चिपळूणमध्ये समर बोटिंगसह क्रोकोडाईल सफारीचे आयोजन

सांगली - निसर्गाच्या अविष्काराने समृद्ध झालेल्या कोकणातल्या चिपळूणमध्ये समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल चिपळूण मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून ४ ते ६ मे दरम्यान या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.


हेही वाचा - सांगली लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार कोण ? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
निसर्गरम्य कोकणातल्या चिपळूण परिसरातील पर्यटनाचे अनेक ठिकाणी जगासमोर यावेत आणि पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळावा, या उद्देशाने ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून दरवर्षी सफारीचे आयोजन करण्यात येत आहे. पूर्ण क्षमतेने बारमाही वाहणाऱ्या चिपळूणमधील वशिष्ठी नदीच्या तीरावर, शहराचे पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी आणि गोवळकोट धक्का परिसरात फेस्टिवल पार पडणार आहे.
हेही वाचा - काँग्रेसकडून मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर; स्वाभिमानी मेळाव्यात तरुणांच्या भावना
फेस्टिव्हल दरम्यान पर्यटकांना जलपर्यटन व क्रोकोडाईल सफारी आणि जंगलाची वेगळी अनुभुती मिळणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पर्यटकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सोसायटीच्यावतीने आज सांगलीत धीरज वाटेकर, निलेश बापट आणि विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES