• A
  • A
  • A
सांगली लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार कोण ? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

सांगली - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, अद्यापही सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तर काँग्रेसनेही भाजपच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे निश्चित केले नाही.

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. मात्र, असे असतानाही भाजपमधील नाराज गटाने संजयकाकांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपमधून अनेक इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपाचे जेष्ठ नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनीही आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे भाजपात संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातून आव्हान देण्यात आले. विद्यमान खासदार असूनही संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर प्रत्यक्षात खासदार संजयकाका पाटील यांनी आपणच दावेदार असून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.


प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसकडे या मतदार संघात उमेदवार कोण ? हे आद्यप जाहीर होऊ शकले नाही. गतवेळी लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. त्यानंतर प्रतीक पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार बदलण्याच्या हालचाली महिन्यापासून सुरू आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस नेते विशाल पाटील, दिवंगत मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर ऐनवेळी प्रतीक पाटलांचेही नाव चर्चेत आले आहे. मात्र, अद्याप काँग्रेस उमेदवार कोण असेल याबाबत शिक्कामोर्तब होऊ न शकल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था आहे.


सांगली लोकसभा मतदार संघ

गेल्या ६० वर्षांपासून सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसची एकहाती सत्ता राहिली होती. ३५ वर्षे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे सांगली लोकसभा मतदार संघावर वर्चस्व राहिले आहे. १९८० ते २०१४ पर्यंत वसंतदादा पाटील, त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील, चुलत नातू मदनभाऊ पाटील आणि वसंतदादाचे नातू प्रतीक पाटील यांनी सांगली लोकसभेचे नेतृत्व केले आहे. काँग्रेसचा पराभव करण्यासाठी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अपक्ष उमेदवाराशी तह करत आपला अधिकृत उमेदवार मागे घेत अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला होता. देशातील हे एकमेव उदाहरण होते. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला मोदी लाटेत उध्वस्त झाला आणि पहिल्यांदाच भाजपचा झेंडा सांगली लोकसभेवर फडकला.

सांगली लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यामध्ये तीन मतदारसंघात भाजपचे तर एका मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.


मतदार संख्या

एकूण मतदार संख्या - २३ लाख ५० हजार ३५९ .

पुरुष मतदार - १२ लाख १० हजार ९४०

स्त्री मतदार - ११ लाख ३९ हजार ३५६

तृतीयपंथी - ६३.

सांगली मतदारसंगात भाजपची सत्ता असतानाही भाजपाच्या उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. तर दुसरीकडे सद्यस्थितीत खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात मैदानात कोणाला उतरवायचे हा काँग्रेससमोर प्रश्न पडला आहे. यामुळे सांगली लोकसभेचे भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार कोण ? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES