• A
  • A
  • A
प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणाऱ्यांनी सरकारच्या धोरणावर बोलू नये - सदाभाऊ खोत

सांगली - प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे पक्ष बदलणाऱ्यांनी सरकारच्या धोरणावर बोलू नये, अशी घणाघाती टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींवर केली.


काँग्रेस-राष्ट्रवादी चोराच्या आळंदीला निघाली, अशी टीका करणारे आता त्यांच्याच गाडीत बसले आहेत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.
हेही वाचा - सांगलीत पाठलाग करून धारधार शस्त्रांनी कामगाराची निर्घृण हत्या
राजू शेट्टी यांनी साखर आणि दूध दराबाबत आपण समाधानी नाही, अशी खंत व्यक्त केली होती. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. सवंग लोकप्रियतेसाठी आरोप, घोषणा आणि भाषणे करणे खासदार राजू शेट्टींच्या सवयीचा भाग झाला आहे. ते खरे शेतकरी नेते असतील तर पाच वर्षांपूर्वीच्या सरकारच्या काळातील दूध अनुदानाचा जीआर काढून बघावा आणि मग बोलावे, असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

हेही वाचा -जत उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी कलंक पुसणार - खासदार संजयकाका पाटील
प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे पक्ष बदलणाऱ्या शेट्टी यांनी सरकारच्या धोरणावर बोलू नये, असा टोला लगावला. म्हणाले, ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर देहूच्या आळंदी ऐवजी चोराच्या आळंदीला निघाल्याची टीका केली होती. आज त्यांच्याच गाडीत राजू शेट्टी बसले आहेत. गेल्या पाच वर्षात शेतकरी समाधानी झाले आहेत, त्यामुळे राजू शेट्टींना आंदोलन करण्याची गरज उरली नाही, असा टोलाही खोत यांनी लगावला आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES