• A
  • A
  • A
'पंकजा मुंडेंवर मोबाईल घोटाळ्याचा आरोप म्हणजे राजकीय दुकानदारी'

सांगली - पंकजा मुंडेंवरील मोबाईल घोटाळ्याच्या आरोपावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेवर सडकून टीका केली आहे. राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी मंत्री पंकजा मुंडें यांच्यावर धनंजय मुंडे आरोप करत असल्याचा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला. केवळ पक्षात मान-सन्मान मिळावण्यासाठी ही दुकानदारी सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री सदाभाऊ खोत


भाजपच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोबाईल घोटाळ्याचा आरोप केला आहे. चिक्की घोटाळ्यानंतर मोबाईल घोटाळ्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपावरुन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी केलेले घोटाळ्याचे आरोप म्हणजे आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी केलेले आरोप असल्याची टीका केली आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळावा आणि पक्षाला आपले दुकान चालू आहे, हे दाखवण्यासाठी राजकीय हेतूने हे आरोप केल्याचा टोला त्यांनी लगावला. कोणत्याही प्रकारचा मोबाईल घोटाळा झाला नसून मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. धनंजय मुंडे यांच्या आरोपांना आगामी निवडणुकीत योग्य उत्तर देऊ, असा इशाराही मंत्री खोत यांनी यावेळी दिला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES