• A
  • A
  • A
नातवंडांसोबत आजी-आजोबा हरवले बालपणात, सांगलीत भरला स्नेहमेळावा

सांगली - आई-वडील आणि मुले यांच्यात आज एका बाजूला दुरावा निर्माण होताना दिसत आहे. असे असताना सांगलीमध्ये मात्र, आजी-आजोबा आणि नातवंडाच्या नात्याला घट्ट करणारा उपक्रम राबवण्यात आला. आजी-आजोबा आणि नातवंडांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नातवंडासोबत आजी-आजोबा बालपणात हरवल्याचे पाहायला मिळाले.


हेही वाचा - नातीला वाचवताना आजोबांचा पाय निकामी

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यात एक वेगळेच नाते असते. या नात्याला अविस्मरणीय बनवण्यासाठी सांगलीच्या नवभारत शिक्षण मंडळाकडून आजी-आजोबा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शांतिनिकेतन विद्यापीठ परिसरात हा नात्यांचा मेळा भरला होता. आयुष्याच्या सरत्या शेवटी आपल्या नातवंडांसोबत सुखद क्षण व्यतीत करता यावेत या उद्देशाने दरवर्षी लेफ्टनंट जनरल एस.पी. थोरात अकॅडमीच्यावतीने आजी-आजोबा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते.


हेही वाचा - जसप्रीत बुमराहाचे आजोबा उदरनिर्वाहासाठी चालवतात टेम्पो. .


आपल्या नातवंडांसोबत मस्त धमाल करता यावी यासाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांसोबत वेगवेगळ्या गेम्समध्ये सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला. इतकेच नव्हे, तर संस्थेकडून आजी-आजोबा आणि नातवंडांना खास रेल्वे सफरची व्यवस्था करण्यात आली होती. ट्रक्टरच्या आगळ्या-वेगळ्या रेल्वेतून आजी-आजोबा आणि नातवंडांनी आनंदाच्या सफरीचा अनुभव घेतला. यावेळी आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद त्यांच्या आयुष्यातील बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारा होता.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.