• A
  • A
  • A
महापालिकेच्या वर्धापन दिनी पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धरला ठेका

सांगली - महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झिंगाट होऊन मनमुराद आनंद लुटला. गाण्यांच्या तालावर ठेका धरत महिलांसह कर्मचाऱ्यांनी धमाल उडवून दिली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त पालिकेकडून पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विरुंगुळा म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.हेही वाचा - सांगलीच्या शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार पीक कर्ज

शहरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली विविध कला सादर करत सगळ्यांची करमणूक केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर संगीता खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मीरा निलाखे यांनी आपल्या सुरेल गायनातून सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले.
याशिवाय सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी जिये तो जिये कैसे हे गाणे तर यशया तालुरी यांनी गणेश वंदना सादर केली. धनपाल सोकटे यांनी दे दे प्यार दे या गाण्यावर सर्वांना नाचवले. संजय सवणे यांनी मितवा रे तर उत्तम पांढरे यांनी तेरे जैसा यार कहा या गाण्याने सर्वाना मंत्रमुग्ध केले. यावेळी सादर झालेल्या गाण्यांवर नाट्यगृहात उपस्थित असणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांनी ठेका धरत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.


हेही वाचा -सरकारने पुणतांबा कृषीकन्या आंदोलन दडपशाही पद्धतीने मोडले - रघुनाथ पाटील
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES