• A
  • A
  • A
सांगलीच्या तरुणांची ३ नायजेरियन तरुणांकडून ८५ लाखांची फसवणूक

सांगली - विट्यातील तरुणांना ३ नायजेरियन तरुणांनी ८५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. परकीय चलनातून भारतीय चलनाप्रमाणे तिप्पट-चौपट रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तिघा नायजेरियन तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


विट्यातील सचिन लोटके याची काही वर्षांपूर्वी मार्क विल्यम उर्फ इसाई कीपेनेतीज मुताई (नामीबिया देश), डॉ. मलीक साहीब (रा. दिल्ली) व जॉन ओबीना चुकवुडी (नायजेरीया) या तिघांशी ओळख झाली. यातून तिघांनी सचिनचा विश्वास संपादन करून परकीय चलनातून भारतीय चलनाप्रमाणे तिप्पट-चौपट पटीत रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या सर्व प्रक्रियेसाठी सचिन लोटके व त्यांच्या मित्रांकडून त्या तिघांनी रोख स्वरूपात वेळोवेळी ८४ लाख ८० हजार रूपये घेतले.
हेही वाचा- सरकारने पुणतांबा कृषीकन्या आंदोलन दडपशाही पद्धतीने मोडले - रघुनाथ पाटील
मात्र, ब्लँक करन्सी विदेशी युरोमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया करत असताना त्या तिघांनी दिलेले काळे कागद, लिक्वीड, ५०० युरो चलनाच्या १२० नोटा व इतर साहित्य याद्वारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली असता ते सर्व काळे कागद, लिक्वीड, ५०० युरो चलनाच्या १२० नोटा व लॉकर्स बनावट असल्याचे समजले. त्यामुळे सचिन लोटके यांनी नायजेरियन तरुणांना वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिघांनीही बनवाबनवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत मार्क विल्यम उर्फ इसाई मुताई, डॉ. मलीक साहीब व जॉन चुकवुडी या तिघांवर विटा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपींविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- अपघाताने खासदार झालेल्यांना गांभीर्याने घेत नाही; संजय पाटलांचा प्रतीक पाटलांना टोला

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES