सरकारने पुणतांबा कृषीकन्या आंदोलन दडपशाही पद्धतीने मोडले - रघुनाथ पाटील
सांगली - सरकारने पुणतांबा कृषीकन्या आंदोलन दडपशाही पद्धतीने मोडून काढल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केला आहे. तसेच खासदार राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी शेट्टी भाजपवर टीका करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते सांगलीच्या इस्लामपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
शेतकऱ्यांवर दडपशाही करणारे हे पहिलेच सरकार नाही. काँग्रेसच्या काळातही शेतकऱ्यांवर गोळा घालण्यात आल्या असल्याचा आरोपही त्यांनी यावेशी केला. सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज येथील शेतकरी आंदोलनावर काँग्रेस सत्तेच्या काळात घडलेल्या अत्याचाराची आठवण करून दिली. काँग्रेस आणि भाजप हे शेतकरी विरोधी असल्याचेही ते म्हणाले. हेही वाचा - रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर गोंदिया मध्यप्रदेशला जोडा - कमलनाथ भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष शेतकरी विरोधी असून येणाऱ्या निवडणुकीत तिसरी आघाडी उभी करण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.