• A
  • A
  • A
तब्बल सव्वालाख स्क्वेअर फुटाची साकारणार 'शिवराज्याभिषेक' विश्वविक्रमी महारांगोळी

सांगली - येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल सव्वालाख स्क्वेवर फुटाची 'शिवराज्याभिषेक' विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार कलाशिक्षक मिळून शिवरायांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी ही महारांगोळी साकारणार आहेत. लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम उपक्रम साकारला जाणार आहे.


शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने भव्य दिव्य शिवराज्याभिषक महारांगोळी साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे १ हजार कलाशिक्षक मिळून १४ फेब्रुवारीपासून हा विश्वविक्रम साकारण्यासाठी सुरुवात करणार आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये हा विश्वविक्रमी शिवराज्याभिषक महारांगोळी साकारण्यात येणार आहे. २५० बाय ५५० फूट या महारांगोळीसाठी तब्बल ३० टन रांगोळी आणि ५ टन विविध रंग वापरण्यात येणार आहेत.

हेही वाचा -आरएसपी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी पथसंचलनाने ३० व्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचा समारोप
या महारांगोळीची गिनीज बुक, एशिया बुक, लिम्का बुक इंडिया बुक अशा विविध ९ वर्ल्ड बुकमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या महारांगोळीसाठी ३० लाख रुपये खर्च होणार असून लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम उपक्रम होणार आहे. यासाठी प्रसिध्द रोंगोळीकार आदमअली मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज्याभिषेक विश्व विक्रमी रांगोळी उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. ६ दिवस ही महारांगोळी काढण्यासाठी लागणार असून १९ फेब्रुवारी रोजी याचे उद्घाटन होऊन भव्यदिव्य कलाकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -सांगलीच्या शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार पीक कर्ज


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES