• A
  • A
  • A
आरएसपी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी पथसंचलनाने ३० व्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचा समारोप

सांगली - शहरात ३० व्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला. गेल्या ७ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असणाऱ्या सप्ताहाचा पोलीस मुख्यालय येथे आरएसपीच्या विद्यार्थांच्या लक्षवेधी पथसंचलनाने समारोप झाला.


हेही वाचा - सांगलीत रिव्हर्स रिक्षा स्पर्धेदरम्यान अपघात, तक्रार दाखल
सांगली जिल्ह्यात ४ फेब्रुवारीला रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली होती. या सप्ताहात जिल्ह्यात ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवणे, वाहनांना जनजागृती स्टिकर चिटकवणे, जनजागृती रॅलीच्या माध्यमातून वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यात आली. याचबरोबर रस्ते सुरक्षा ही काळाची गरज असल्याने शाळा महाविद्यालय स्तरावरही मोहीम राबवण्यात आली.

हेही वाचा - साखर जप्तीची कारवाई करा अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन - स्वाभिमानी शेतकरी संघटना
आज या रस्ते सुरक्षा सप्ताहाचा शानदार सोहळ्यात समारोप झाला. या कार्यक्रमासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे आणि जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरएसपीच्या विद्यार्थांनी लक्षवेधी पथसंचलन केले. तसेच पत्रकार दीपक चव्हाण यांच्या शोले स्टाईल दुचाकीच्या रस्ते सुरक्षेबाबतच्या चित्ररथानेही या समारोप कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुरक्षा सप्ताहा दरम्यान घेण्यात आलेल्या विविध शालेय स्तरावरील स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सांगली शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन केले होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES