• A
  • A
  • A
पाण्याच्या मागणीसाठी खासदाराच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

सांगली - जत तालुक्यातील सोरडी गावाचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा या मागणीसाठी दुष्काळग्रस्तांनी खासदार संजय पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गावातील तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी सांगलीमध्ये सोरडी ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरू केले आहे.


हेही वाचा - आंबेगावमध्ये डाळिंबाच्या बागेवर दुष्काळी संकट, पाणी विकत घेऊन टँकरने...
दुष्काळी जत तालुक्यातील सोरडी गावचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी विविध माध्यामातून लढा सुरू आहे. मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त सोरडी ग्रामस्थांनी थेट सांगलीचे खासदार तथा कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. सोरडी गावाचा म्हैसाळ सिंचन योजनेत समावेश झाला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हेही वाचा - ठाण्यात पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES