• A
  • A
  • A
सांगलीत रिव्हर्स रिक्षा स्पर्धेदरम्यान अपघात, तक्रार दाखल

सांगली - हरिपूर गावामध्ये आयोजित रिव्हर्स रिक्षा शर्यतीदरम्यान अपघात घडला. या अपघाताचा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.


हेही वाचा - दोन मुलांची आई जिगरबाज 'माया' बनली ई-रिक्षा चालक
सांगली नजीकच्या हरिपूर गावात आज संगमेश्वर शिळा यात्रेनिमित्त रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे १२ रिक्षा स्पर्धकांनी रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभाग घेतला होता. गल्ली-बोळ आणि अवघड वळण अशा अडथळ्यातून सुसाट मार्गक्रमण करत कमी वेळात अंतर पार करण्याच्या या स्पर्धेत रिक्षा चालकाचे कौशल्य पणाला लागले होते. ३ किलोमीटरचे अंतर आणि सुमारे ७०-८० ताशी वेगाने उलट्या धावणाऱ्या रिक्षा यामुळे एक वेगळा थरार या ठिकाणी पाहायला मिळात होता.
हेही वाचा - चालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेले लाखोंचे दागिने प्रवाशी...
या स्पर्धेदरम्यान उलट्या रिक्षाचा पाठलाग करणाऱ्या आयोजक दुचाकीस्वाराचा रिक्षाला धडकून अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुचाकीवरील दोघेही रिक्षाला धडकल्याने पडले. हा अपघात जीवघेणा वाटला. मात्र दोघे या अपघातात किरकोळ जखमी झाले. दरम्यान सांगली पोलिसांनी या सर्व प्रकरणाची दखल घेतली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार झाली असून या स्पर्धांसाठी पोलीस परवानगी, सुरक्षा आदी बाबींची काळजी घेतली होती का ? याबाबत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.
हेही वाचा - सांगलीमध्ये रंगला रिव्हर्स रिक्षांच्या शर्यतींचा थरार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES