• A
  • A
  • A
मराठमोळी स्मृती मंधाना जगातील अव्वल एकदिवसीय महिला क्रिकेटपटू

दुबई - आयसीसीने जाहीर केलेल्या महिला क्रिकेटपटूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मंधानाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्मृतीने मागील १५ एकदिवसीय सामन्यांत ८ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा तिला फायदा झाल्याने क्रमवारीत तिने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

Pic courtesy - ANI


हेही वाचा - 'क्रिकेटची पंढरी' निघाली पांढऱ्या रंगात न्हावून
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत स्मृती मंधानाने शानदार कामगिरी करताना कारकिर्दीतले चौथे शतक झळकावले होते. त्याबरोबर, तिने नाबाद ९० धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे तिने ३ स्थानांची झेप घेत ७५१ गुणांसह क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला. स्मृतीने प्रथम क्रमांक पटकावताना ऑस्ट्रेलियाच्या ऐलिस पेरी आणि मेग लॅनिंग यांना मागे टाकले. तर, भारताची अनुभवी फलंदाज मिताली राज २ स्थानांनी घसरुण पाचव्या क्रमांकावर आली आहे.
हेही वाचा - अँटिगा कसोटी: ब्रॉड-अलीची शानदार गोलंदाजी, विंडीजला ८५ धावांची आघाडी
महिलांच्या गोलंदाजी क्रमवारीत वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने एका क्रमांकाची प्रगती करताना चौथे स्थान पटकावले आहे. तर, पुनम यादव आणि दिप्ती शर्मा यांनी पाच स्थानांची प्रगती करताना अनुक्रमे आठवे व नववे स्थान पटकावले. गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानची सना मिर पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा - दादाचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला सुवर्णसंधी


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES