• A
  • A
  • A
८ लाख कोटींच्या शेतीमाल निर्यातीसाठी आराखडा तयार - सुरेश प्रभू

सांगली - देशातील ८ लाख कोटी रुपयांचा शेतीमाल निर्यात करण्याचा आराखडा केंद्र सरकारकडून तयार करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. तसेच 'जी आय' मार्फत जागतिक बाजारपेठ महिला आणि शेतकऱ्यांना उपलब्द करून देण्याचा उपक्रम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. ते आज सांगलीमध्ये आयोजित 'बेदाणा असोसिएशन'च्या रौप्य महोत्सव सोहळ्या प्रसंगी बोलत होते.


हेही वाचा-दहा लाखांची खंडणी घेताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला अटक
पुढे बोलताना ते म्हणाले, बेदाणा आणि द्राक्षाबाबत शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळत नाही, ही मोठी अडचण आहे. यावर येत्या १५ दिवसात बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिले. तसेच काही वर्षांपूर्वी परदेशातून बेदाणा आयात केला जात होता. मात्र, आज बेदाणा परदेशात निर्यात होतो. हे सर्व येथील शेतकरी, व्यापारी यांच्यामुळे झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याला आणि येथील शेतकऱ्यांना भारतरत्न दिला पाहिजे, असेही मंत्री प्रभू यावेळी म्हणाले.
सांगलीच्या तासगावमध्ये सांगली-तासगाव बेदाणा मर्चंटस असोसिएशनचा रौप्य महोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मुख्य उपस्थितीत लावली होती. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला. सोहळ्या दरम्यान बेदाणा असोसिएशनकडून प्रभू यांचा बेदाण्याचा हार घालून स्वागत करण्यात आले. या समारंभ प्रसंगी बेदाणा क्षेत्रातील अडचणी आणि समस्या व्यापाऱ्यांकडून मंत्री प्रभू यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश खाडे यांच्यासह बेदाणा व्यापारी व मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा-हा तर निवडणुकीपुर्वीचा फसवा अर्थसंकल्प ; शेतकऱ्यांचा सन्मान नसून अपमान - प्रतिक पाटीलCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES