• A
  • A
  • A
दहा लाखांची खंडणी घेताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला अटक

सांगली - दहा लाख रुपयांची खंडणी घेताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सुयोग औंधकर असे या जिल्हाध्यक्षाचे नाव असून, सहकारी निबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांकडून खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली आहे.

सुयोग औंधकर


हेही वाचा - गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या, ११ दिवसात ७ जणांच्या हत्या

सांगलीच्या इस्लामपूर येथे दहा लाखांची खंडणी घेताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर त्याच्या साथीदाराला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. इस्लामपूरमधील सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याकडून ही खंडणी घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ अटक केली. जानेवारी २०१७ मध्ये वाळव्याच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाची प्रसिद्धी नोटीस फलकावर का लावली नाही. यावरून सहायक निबंधक आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. याबाबत इस्लामपूर पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री डफळे यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी घेताना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - कोरेगाव भीमा दंगल : प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक

इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच औंधकर सोबत खंडणी मागण्यात साथ देणाऱ्या माहिती अधिकारी कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम यालाही पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा - आपले पत्र मिळाले, धन्यवाद; 'पीएमओ'ने उडवली अण्णांची खिल्लीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES