• A
  • A
  • A
हा तर निवडणुकीपुर्वीचा फसवा अर्थसंकल्प ; शेतकऱ्यांचा सन्मान नसून अपमान - प्रतिक पाटील

सांगली - केंद्र सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी जोरदार टीका केली. हे निवडणुकीपुर्वीचे फसवे बजेट आहे. शेतकऱ्यांना ५०० रुपये मदत म्हणजे सन्मान नसून अपमान असल्याचे पाटील म्हणाले.



मोदी सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले हे बजेट असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या बजेटमध्ये देशातील जीडीपी दर वाढलेला दाखवला आहे. पण दुसरीकडे रोजगार घटलेला आहे. हे वास्तव असताना जीडीपी वाढला कसा हा मोठा प्रश्न आहे. त्याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. सर्वसामान्यांसाठी ५ लाखांपर्यंत कर सवलत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण त्यामध्ये नियम अटी आहेत. सर्वसामान्यांना मतांसाठी आकर्षित करण्यासाठी ही घोषणा केली असल्याचे पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणून वार्षिक ६ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याला महिन्याला ५०० रुपये आणि दिवसाला १९ रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण आजच्या घडीला १९ रुपयात काय येते असा सवाल करत ही घोषणा शेतकऱ्यांच्या दृष्टीने सन्मान नसून अपमान असल्याची टीका पाटील यांनी केली.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES