• A
  • A
  • A
नागरी सुविधेवरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात शिवसेनेचे आंदोलन

सांगली - महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात शिवसेनेने आज सांगलीत आंदोलन केले. शहरात अशुद्ध पाणीपुरवठा सुरू असल्याचा व घंटागाडी खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत सांगली महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.


हेही वाचा - अर्थसंकल्पात सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांची चेष्टा केली - स्वाभिमानी शेतकरी संघटना
सांगली महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप कारभाऱयांच्या विरोधात आज शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. सांगली महापालिका क्षेत्रात २४ तास शुद्ध पाणी देऊ, असे आश्वासन भाजपने दिले आहे. मात्र, सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरात अशुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या रिक्षा घंटागाडी व औषध फवारणी यंत्र खरेदीमध्ये गौडबंगाल होऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेने करत आज याविरोधात महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध पाण्याच्या बाटल्या अडकवून आणि प्रतिकात्मक औषध फवारणी करून भाजप सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES