• A
  • A
  • A
साखर जप्तीची कारवाई करा अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन - स्वाभिमानी शेतकरी संघटना

सांगली - ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गुरुवारी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करा. अन्यथा, ५ फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा संघटनेकडून गुरुवारी देण्यात आला. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.


हेही वाचा - सात दिवसांत एफआरपीची रक्कम न दिल्यास फौजदारी कारवाई; साखर आयुक्तांचे आश्वासन

जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना दिली नाही. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्याकडे तब्बल ४०० कोटीहून अधिक एफआरपी थकीत आहे. एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावरील आंदोलन करण्यात आले होती. त्यावेळी आयुक्तांनी सांगली जिल्ह्यातील ५ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. या कारखान्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले.

हेही वाचा - थकित एफआरपीसाठी पुण्यातील साखर संकुलावर स्वाभिमानीचे आंदोलन




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES