• A
  • A
  • A
शिवसेनेची शिवनेरी ते तुळापूर निर्धार यात्रा

पुणे - सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहेत. शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडत किल्ले शिवनेरी ते तुळापूर, अशी निर्धार यात्रा आज पुणे-नाशिक महामार्गावरू काढण्यात आली. राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मृती शिल्पाला अभिवादन करून यात्रा तुळापूरच्या दिशेने निघाली आहे.


हेही वाचा - शिवसेना खासदाराचा प्रचार रुग्णवाहिकेतून
शिवसेनेकडून किल्ले शिवनेरीवर आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटील यांनी चौकार मारण्याची तयारी सुरू केली आहे. शिवनेरीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विजयाची निर्धार यात्रा काढण्यात आली.
हेही वाचा - ससून रुग्णालय मारहाण प्रकरण; नगरसेविकेवर कारवाईसाठी डॉक्टरांचा काम बंदचा इशारा
सध्याची दुष्काळी परिस्थिती त्यातून कडाक्याचं ऊन, अशात ही विजयाची निर्धार यात्रा होरपळत निघाली आहे. आज दुपारी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मृतीशिल्प व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार आढळराव पाटील हे कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थान असलेल्या तुळापूर येथे जाणार आहेत.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES