• A
  • A
  • A
दारू पिताना झालेल्या वादातून पुण्यात एकाची हत्या

पुणे - दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या झाल्याची घटना शहराच्या खडकी परिसरात घडली. गोपाळ अर्जुन कांबळे (वय २९) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन महिलांसह पाच जणांनी मिळून गोपाळच्या डोक्‍यात दगड घालून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खडकीतील जुना बाजार परिसरात लष्करी अधिकार्‍यांचा बंगला आहे. या बंगल्यात मयत आणि आरोपी बुधवारी रात्री दारू पीत बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि दोन महिलांसह ३ पुरूष आरोपींनी एकत्र येत गोपाळ कांबळे त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी त्यांच्यातील एकाने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

खडकी पोलीसांनी याप्रकरणी रेणुका परदेशी, राधा स्वामी यांना अटक केली आहे. तर राजेश राजू स्वामी, सागर उंबरकर आणि धीरज गवळी या तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES