• A
  • A
  • A
लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस वरीष्ठ पातळीवर - हर्षवर्धन पाटील

पुणे - लोकसभेच्या पुण्यातील जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवार नावांची शिफारस वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. आता याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून लवकरच जाहीर केला जाईल, असे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. पुण्यात काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.


पुण्यात प्रचार समितीची पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली होती. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची नावे २ दिवसात निश्चित होईल. सांगली, पुणे आणि सोलापूर उमेदवारीवर गुरुवारी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले, सुजय विखेंची वैयक्तिक भुमिका आहे. ते भाजपत गेल्याने तो विषय आमच्या चर्चेत नाही. राधाकृष्ण विखे कुटुंबीयांनी आम्ही काँग्रेस बरोबर असल्याचे म्हटले आहे. वरीष्ठ नेते राजू शेट्टी यांच्या संपर्कात आहोत. वर्धा आणि बुलढाण्याचा मागणी करत आहे. एक जागा राष्ट्रवादीने सोडली आहे तर आम्ही एक जागा सोडणार असून कोणती जागा सोडणार हे लवकरच निश्चित होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES