• A
  • A
  • A
पार्थ पवारांनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन; विजयासाठी मागीतला देवीला कौल

पुणे - मावळ लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्ला गडावरील एकवीरा देवीचे आज बुधवारी दर्शन घेतले. एकवीरा देवी कोळी, आग्री, सोनार या समाजाची व घाटाखालील नागरिकांचे श्रध्दास्थान आहे. रायगड जिल्ह्यात एकवीरा देवीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग असल्याने व मतदार संघातील एकवीरा हे जागृत देवस्थान असल्याने पार्थ पवार यांनी आज सकाळी ९ वाजता गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले.


मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदार संघ व रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे विधानसभा मतदार संघ येतात. पार्थ पवार यांनी देवीचा आशीर्वाद घेत विजयाचा कौल मागितला. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकवीरा देवीचे दर्शन घेण्याकरिता आलेले पार्थ हे पहिलेच उमेदवार आहेत.
वाचा- 'चौकीदार चोर है' या वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत?
यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सचिव उमेशदादा पाटील, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, संत तुकाराम सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक सचिव मारुती देशमुख, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा- अमरावतीतील २ दुष्काळी गावं झाली 'पाणी'दार; बचतीच्या उपक्रमातून कायापालट

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES