• A
  • A
  • A
ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला भाजप नगरसेविकेची मारहाण

पुणे - ससून रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरला भाजप नगरसेविकेने मारहाण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मारहाण झालेल्या डॉक्टर स्नेहल अशोक खंडागळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा विभागात हा प्रकार घडला.


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तक्रारदार डॉक्टर स्नेहल खंडागळे या एका गंभीर रुग्णावर उपचार करत होत्या. त्याचवेळी आरोपी नगरसेविका आरती कोंढरे त्याठिकाणी आल्या. दुसऱ्या एका बेडवर असलेल्या रुग्णांविषयी विचारणा करून येथे डॉक्टर कोण आहेत, या रुग्णाकडे कोण पाहत आहे? अशी विचारणा करत आरडाओरडा करू लागल्या.
वाचा - मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
दरम्यान याच वेळी खंडागळे या ठिकाणी आल्या असता आरती कोंढरे यांनी त्या रुग्णावर त्वरित उपचार करण्यास सांगितले. रुग्णावर प्राथमिक उपचार झाले असून पुढील तपासणीकरता पाठवायचे असल्याचे कोंढरे यांना सांगितले. परंतु, कोंढरे यांनी काहीही न ऐकता या रुग्णाला लगेच घेऊन जा, असे सांगत आरडाओरडा केला आणि डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मारहाण केली. या सर्व प्रकारानंतर डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES