• A
  • A
  • A
'कॉलेज डायरी' चित्रपटाच्या कलाकारांची पुण्यात वितरकांना मारहाण

पुणे - 'कॉलेज डायरी' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. परंतु, हा सिनेमा जितक्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित होते, तितक्या चित्रपटगृहात तो प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी दोघा वितरकांना चांगलेच चोपले. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर हा प्रकार घडला.


चित्रपटाला अपेक्षित चित्रपटगृह मिळाले नसल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत चित्रपटातील दोन कलाकारांनी वितरक योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांना मारहाण केली.
हेही वाचा - धनगर आरक्षणाची कागदपत्रे हरवणे ही जनतेची फसवणूक - सुप्रिया सुळे
वितरक असलेल्या योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी कॉलेज डायरी हा सिनेमा १०० चित्रपटगृहात दाखवण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी निर्मात्याकडून पैसेही घेतले. परंतु, प्रत्यक्षात केवळ ४५ चित्रपटगृहातच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याचे निर्माते-दिग्दर्शक अनिकेत घाडगे यांचे म्हणणे आहे. या रागातून सिनेमातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांना पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर वितरकांना चांगलाच चोप दिला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES