• A
  • A
  • A
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सावळा गोंधळ; दालनात महापौर, सभापतींचे फोटोच नाहीत

पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपला माजी महापौर आणि स्थायी समिती सभापतींचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पालिका दालनात महापौर व सभापतींचे फोटोच लावण्यात आलेले नाही.


राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुरुंग लावत भाजपने पिंपरी-चिंचवड पालिकेची सत्ता एकहाती संपादीत केली. पहिल्यांदाच सत्तेत बसलेल्या भाजपच्या कार्यकाळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडून भाजपचे प्रथम व तत्कालीन महापौर नितीन काळजे व स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांची वर्णी लागली त्यांच्या कार्यकाळानंतर नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव व स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांची या पदावर निवड झाली आणि आज त्यांचाही कार्यकाळ संपत आला तरी पहिले महापौर व स्थायी समिती सभापतींचे फोटो त्यांच्या दालनात आजतागायत लावण्यात आलेले नाहीत.
हेही वाचा -ममतांकडून सर्वच जागांवर उमेदवार जाहीर; महाआघाडीच्या स्वप्नांना पूर्णविराम?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समितीच्या दालनात एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की, भाजपच्या कार्यकाळातील प्रमुख असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे फोटो त्या दालनात पहावयास मिळत नाहीत. माजी महापौर व स्थायी समिती सभापतींचे फोटो अजून पर्यंत का लावले नाहीत. असा प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे. माजी उपमहापौर शैलेजा मोरे यांचा फोटो त्यांच्या दालनात लावण्यात आला आहे. हा अपवाद वगळता बाकीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले नाहीत.
हेही वाचा -'स्वाभिमानी'ला ३ जागा द्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम

सत्तारूढ पक्षनेत्यांच्या दालनात पुर्वीच्या पक्षनेत्यांचे नाव, फोटो व कार्यकाळ याची कुठलीच माहिती प्रदर्शित करण्यात आलेली नाही. महापौर व स्थायी समितीच्या पदासाठी नेत्यांमध्ये मोठी राजकीय स्पर्धा दिसून येते. पण कार्यकाल संपल्यावर प्रशासन त्या खुर्चीवर बसलेल्या पदाधिकाऱ्याचा कार्यकाल दर्शविणारा फोटो लावण्यात का दिरंगाई करते हा प्रश्न आता पालिकेतील सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES