• A
  • A
  • A
धनगर आरक्षणाची कागदपत्रे हरवणे ही जनतेची फसवणूक - सुप्रिया सुळे

पुणे - धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीची कागदपत्रे हरवल्याचे उत्तर सरकारच्यावतीने मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आले. त्यावर ही सामान्य जनतेची फसवणूक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


हेही वाचा-पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कागदपत्रे हरवल्याचे उत्तर न्यायालयात सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम या फसव्या सरकारने केले आहे. राफेलचे कागदपत्रे हरवल्याचे केंद्र सरकारने तर आता धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदपत्रे हरवल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. म्हणजे त्यांना ज्या वेळी निर्णय घ्यायचा नसतो, त्यावेळी कागदपत्रे चोरीला जातात, किंवा गायब होतात, हे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या.

आज सामान्य माणसांची फसवणूक होत आहे त्याचा निषेध करत असल्याचे सांगत सरकार कष्टकरी आणि सामान्य माणसांची कशा पद्धतीने फसवणूक करतात ते दिसून येत आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा-'स्वाभिमानी'ला ३ जागा द्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES