• A
  • A
  • A
पुण्यात बिबट्याच्या बछड्यांना वनविभागाने मिळवून दिली आईची कुशी, पाहा व्हिडिओ

पुणे - जुन्नर तालुक्यात वडगाव आनंद व लेण्याद्री या गावात एकाच रात्री दोन वेगळ्या ठिकाणी बछड्यांना बिबट मादीकडे सुखरुप सोपविण्यात बिबट निवारा केंद्र व वनविभाग यांना यश आले आहे. आज पर्यंत ५४ बछड्यांचे व मादी बिबट्यांचे निवारा केंद्राने मिलन घडवुन आणले आहे.


हेही वाचा - 'स्वाभिमानी'ला ३ जागा द्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम
सध्या ऊसतोड जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यांमध्ये सुरू असून ऊस तोडीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिबट्याचे वास्तव्य असणारी ऊस शेती संपत चालली आहे. बिबट्याचा व त्याच्या पिल्लांचा संगोपनाचा प्रश्न समोर उभा राहिला असताना बिबट्या आपल्या पिलांच्या संगोपनासाठी विविध ठिकाणच्या जागा शोधत असतो. यातून मानवी वस्तीत बिबट्या आल्यामुळे नागरिक व पाळीव प्राण्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत. ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून यामध्ये बिबट्या व त्याची पिल्ले जेरबंद होत असतात.
हेही वाचा - लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी स्वाभिमानीची पुण्यात बैठक
बिबट्या व त्याच्या बछडा यांच्यात कधीच दुरावा येऊ नये यासाठी बिबट्या निवारा केंद्र आणि वनविभाग सातत्याने प्रयत्न करत असतात. बछडा व मादी यांची अनोखी भेट घडून देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये मादी बिबट्या आपल्या पिल्लांच्या शोधात फिरत येऊन आपल्या पिल्लांना जवळ घेत आहे. यातूनच आई आणि पिल्लाचं एक वेगळं नातं पाहायला मिळत आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES