• A
  • A
  • A
लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी स्वाभिमानीची पुण्यात बैठक

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणी कोअर कमिटीची पुण्यात बैठक घेण्यात आली. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीती आणि व्यूह रचना ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.


हेही वाचा- सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखेंवर कारवाईची शक्यता
राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष हा आघाडीत सहभागी होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप काँग्रेस सोबतचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सूचनेनुसार जागा सोडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आघाडीत येण्यासाठी स्वाभिमानीचा काँग्रेस सोबत तिढा सुरू आहे. यावर स्वाभिमानीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा- २३ मे'ला जनतेची 'मन की बात’ समोर येईल; शिवसेनेची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
आगामी निवडणुकीत युती सोबत जायचे नाही, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वीच घेतला आहे. मात्र, आघाडी बरोबर जायचे की स्वबळावर लढायचे हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यामुळे राजू शेट्टीं यांच्या कडून चाचपणी करण्यात येत आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी बैठकी आधी राजू शेट्टी यांच्या सोबत चर्चा केली. गेल्या निवडणुकीत युतीचे मित्र पक्ष असलेल्या रासप आणि स्वाभिमानीची सध्या वेगळी वाट आहे. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

Copyright © 2016 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.

For Digital Marketing Enquiries Contact: 9000180611, 040-23318181
Email: marketing@eenadu.net | Powered By Vishwak