• A
  • A
  • A
सैल झालेली दरड काढण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ब्लॉक सुरू

पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ १२ मार्च ते २० मार्च दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे.


राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत. महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा- कल्याणमध्ये बालमजुरांच्या जीवाशी खेळ, लग्नात झगमगाट राहण्यासाठी हातात दिली विजेची छत्री
ब्लॉकचा कालावधी
१) सकाळी १० ते १०:१५
2) सकाळी ११ ते ११:१५
3) दुपारी १२ ते १२:१५
४) दुपारी २ ते २:१५
५) दुपारी ३ ते ३:१५

वाचा- २३ मे'ला जनतेची 'मन की बात’ समोर येईल; शिवसेनेची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
शुक्रवार ते सोमवार या सुट्ट्यांच्या काळात द्रुतगती मार्गावर वाहतूक जास्त असते. म्हणून शुक्रवार १५ मार्चला दुपारी ३:१५ ते सोमवार १८ दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील. यापूर्वीही दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. पावसाळ्याच्या पूर्वी एक्स्प्रेसवेवरील दरड हटवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES