• A
  • A
  • A
मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार रंगणार दुरंगी 'सामना'

पुणे - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २९ एप्रिलला मावळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेतर्फे बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर, राष्ट्रवादीने पार्थ यांची उमेदवारी निश्चित केल्याची माहिती मिळते. त्यामुळे मावळमध्ये बारणे विरुद्ध पवार असा दुरंगी सामना होणार आहे.मावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुसऱ्यावेळी शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिसऱ्यांदा भगवा फडकावण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. तर, शिवसेनेचा पराभव करुन मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी केली आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

शिवसेना-भाजपची युती झाली आहे. भाजपने मावळ मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, शिवसेनेने मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना निश्चित आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील युतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले आहे.

मावळ मतदारसंघातील आमदार

गौतम चाबुकस्वार, पिंपरी (शिवसेना)
लक्ष्मण जगताप, चिंचवड (भाजप)
बाळा भेगडे, मावळ (भाजप)
मनोहर भोईर, उरण (शिवसेना)
प्रशांत ठाकूर, पनवेल (भाजप)
सुरेश लाड, कर्जत खालापूर (राष्ट्रवादी)

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES