• A
  • A
  • A
शिक्षक भरतीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, आंदोलनकर्त्यांचा इशारा

पुणे - राज्यामध्ये प्रलंबित शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांनी दहाव्या दिवशीही आपले उपोषण चालू ठेवले आहे. शिक्षक भरती संदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचा इशारा उमेदवारांनी राज्य सरकारला दिला आहे.


हेही वाचा - राजगुरूनगरमध्ये सैनिक भरती करणाऱ्या तरुणांचा विराट मोर्चा
आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये उपोषणासाठी बसलेल्या उमेदवारांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले असून उमेदवारांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे राज्य सरकार शिक्षक भरती संदर्भात घोषणा करणार असल्याची शक्‍यता वर्तवली केली जात आहे. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहेत मागण्या -

राज्यातील शिक्षक भरती गेल्या २०१० पासून बंद आहे. यामुळे हजारो डीएड, बीएडधारक हवालदिल झाले आहेत. तब्बल २४ हजार जागांसाठी होणाऱ्या या भरतीला होत असलेल्या विलंबामुळे भावी शिक्षकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील उमेदवारांनी ४ फेब्रुवारीपासून पुण्यातील मध्यवर्ती इमारत येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

⦁तत्काळ शिक्षक भरती करावी.

⦁२४ हजारांपेक्षा जास्त जागा भरण्यात याव्यात.

⦁आचारसंहितेपूर्वीच नियुक्ती करण्यात यावी.

⦁११ फेब्रुवारीपर्यंत जागांसोबत भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे.


हेही वाचा - पोलीस भरतीबाबत सरकारचे धोरण म्हणजे अगोदर मूल आणि नंतर लग्न - भाऊसाहेब...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES