• A
  • A
  • A
भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी; काकडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पुणे - भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी काकडेंनी अजित पवारांवर स्तुतीसुमनेही उधळली. मुख्यमंत्री माझ्या भावासारखे आहेत. पण भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी आली, असे वक्तव्य काकडेंनी केले. त्यामुळे काकडे राष्ट्रवादीशी घरोबा करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.


काकडे म्हणाले, की मध्यंतरी मी भ्रमिष्ट झालो होतो. भाजपने माझा वापर करुन घेतला. पुण्यात अजित पवारांचे मोठे वजन आहे. राष्ट्रवादीचे मोठे मतदाने आहे. म्हणून त्यांना भेटायला आलो, असे काकडे म्हणाले. काकडेंच्या या वक्तव्यामुळे ते राष्ट्रवादीशी सलगी करु पाहत असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
अजित पवारांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, की ही जागा काँग्रेसला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्याचा उमेदवाराचा प्रचार करेल. अपक्ष निवडणून येणे सोपे नाही, असे मी संजय काकडेंना सांगितले.

दरम्यान, संजय काकडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काकडेंनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडेही चाचपणी केली होती. मात्र, काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, काकडे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात का हे येणाऱ्या काळात दिसेलच.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES