• A
  • A
  • A
जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन - नितीन गडकरी

पुणे - जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन असे वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे असेही, ते म्हणाले.


पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, गिरीश प्रभुणे, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा केली पाहिजे. ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल त्या दिवशी आपले कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला आहे. त्यामुळे मी जात-पात पाळत नाही. इथे किती पाळतात हे माहीत नाही. मात्र, आमच्या इथे बंद झाली आहे. आमच्या ५ जिल्ह्यात जात काढत नाहीत. कारण मी सगळ्यांना सांगितलेल आहे, की जातीच नाव काढेल त्यांना ठोकून काढेन. या समाजात गरीब-श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये. एकात्म आणि अखंड असा समाज तयार होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES