• A
  • A
  • A
पुण्यातील एल. अँड टी. कंपनीतील कामगारांचे उपोषण सुरूच, एकाची प्रकृती खालावली

पुणे - तळेगाव आंबी एमआयडीसीमधील एल. अँड टी. कंपनीतील कामगारांनी गेटवर सुरू केलेल्या आंदोलनास १४ दिवस होऊनही तोडगा निघालेला नाही. कंपनी व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण आणि काही अधिकारी आणि बडे ठेकेदार यांच्यातील ‘अर्थ’मय साटेलोटे आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आल्याचा आरोप शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर यांनी केला. कंपनीतील सुमारे २०० कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनास बसलेले एल. अॅन्ड टी. कंपनीचे कामगार


दरम्यान, ८ तारखेपासून सुरु झालेल्या आमरण उपोषणाला बसलेल्या ४ कामगारांपैकी महेश वैजनाथ बिराजदार, आनंद चंदू दंडगल, सदानंद राजाराम मुत्केकर हे कायमस्वरूपी कामगार असून नवनाथ देवराम गायकवाड हे कंत्राटी कामगार आहे. त्यापैकी सदानंद मुत्केकरची प्रकृती ढासळल्याने त्याला तळेगाव दाभाडे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - धुळ्यात निवडणूक लढवून दाखवा, गोटे यांचे महाजनांना आव्हान
कामगारांच्या प्रमुख मागण्या -

एल अँड टी डिफेन्सच्या पवई येथील दुसऱ्या शाखेत मिळत असलेल्या सोयीसुविधा आमच्याही शाखेतील कामगारांना मिळाव्यात. बेकायदेशीररित्या कामावरून कमी केलेल्या ९ कायमस्वरूपी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे. सलग ८ ते १० वर्ष (विदाऊट ब्रेक सिस्टीम) कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना कायम कामगार म्हणून रुजू करून घ्यावे.

अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे?

सर्व कामगार डिप्लोमा आणि आयटीआयधारक असूनही त्यांना गेली ९ ते १० वर्ष होऊनही पगारवाढ नाही आणि कसल्याही सोयी-सुविधा नाही. कंपनीचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याने हे आंदोलन कंपनीच्या विरोधात नसून तेथील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरोधात आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव पाळून मावळ भागातील १४० कंत्राटी कामगारांना कोणतीही सवलत मिळत नाही. मावळातील १४० भूमिपुत्रांना काढल्यानंतर त्यांच्या जागी कंपनी व्यवस्थापनाने बाहेरील कामगारांची भरती केली आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - हेल्मेटसक्तीला फक्त राजकीय पक्षांचा विरोध


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES