• A
  • A
  • A
समोसा बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा उडाला भडका; ४ मजूर गंभीर

पुणे - शहरातील कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीतील समोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये ४ मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात शेगडीला गॅस पुरवठा करणारी नळी निघाल्याने आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.हेही वाचा - आघाडीची सत्ता आल्यास जेजुरीच्या विकासासाठी २५० कोटी देणार - सुप्रिया सुळे

भालेकर एम्पायरच्या तळमजल्यावर समोसे बनवण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मजूर समोसे तयार करत होते. तेव्हा गॅस सिलेंडरची नळी निघाली आणि आगीचा भडका उडाला. या आगीत अन्नु चौहान याच्यासह ३ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES