• A
  • A
  • A
दुधाला अनुदान देण्याची योजना गुंडाळली, दुध उत्पादक शेतकरी हवालदिल

पुणे - दुधाला योग्य दर मिळवा, यासाठी राज्यभर आंदोलने झाली. याच आंदोलनामुळे राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेतून सुरू झालेली योजना अवघ्या ६ महिन्यातच गुंडाळण्यात आली आहे. तिला मुदतवाढ देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा हवेत विरली आहे. या अनुदानाची ४०० कोटींपेक्षाही जास्त थकबाकी राज्य सरकारकडे झाली आहे.


राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१८ पासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू केला. त्याची मुदत ३१ ऑक्‍टोबर २०१८ ला संपणार होती. मात्र, त्याआधीच या योजनेला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा सरकारने केली. हा दुसरा टप्पा ३१ जानेवारी २०१९ ला संपला आहे. मात्र, त्याआधीच या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केली. शिवाय, शेतकऱ्यांना त्यांच्या दूध अनुदानाची सर्व रक्कम मिळेल. त्यासाठी सरकारकडील थकबाकीही लवकरच दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा - आघाडीची सत्ता आल्यास जेजुरीच्या विकासासाठी २५० कोटी देणार - सुप्रिया सुळे

राज्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळणारा शेतकरी ही योजना गुंडाळल्याने हवालदिल झाला आहे. त्यातच सरकारने अनुदानाची रक्कम अडवून शेतकऱ्यांची अडवणूक करणे योग्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुध उत्पादन करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाचा बोजा अंगावर घ्यायला लागतो. सध्याच्या महागाईच्या काळात जनावरांचा चारा, भुसार माल यामध्ये मोठा खर्च होत आहे. त्यामुळे दुधासाठी होणारा खर्च पाहता दुधाला बाजारभाव मिळत नाही आणि सरकारही फसवणूक करत आहे.

हेही वाचा- देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी हातभार लावावा, शरद पवारांचा सल्ला
शेतमाल कवडीमोल किमतीला विकला जात आहे. जोडधंदा असणाऱ्या दुधाचीही तिच परिस्थिती आहे. सरकारच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाच्या नावे फसवणूक होत आहे. त्यामुळे या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे 'जगायचं तरी कसं' असा प्रश्न उभा ठाकला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES