• A
  • A
  • A
आघाडीची सत्ता आल्यास जेजुरीच्या विकासासाठी २५० कोटी देणार - सुप्रिया सुळे

पुणे - राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे हा मतदारसंघ देशात नंबर वन ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापेक्षाही अधिक बारामती लोकसभा मतदारसंघात लोकहिताची कामे झाल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी त्यांनी आघाडीची सत्ता आल्यास जेजुरीच्या विकासासाठी २५० कोटी मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाहीही दिली.


जेजुरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटर आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण रविवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी, जेजुरी नगरपरिषदेतील संविधान स्तंभ लोकार्पण सोहळाही पार पडला.

हेही वाचा - भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल, सुप्रिया सुळेंचा पलटवार

राष्ट्रीय वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघ हा वाराणसी मतदार संघाच्याही पुढे गेल्याची माहिती सुळे यांनी दिली. या योजनेच्या साहित्य वाटप कार्यक्रमासाठी १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - प्रियंका गांधीनी पहिली राजकीय सभा नंदुरबारमध्ये घ्यावी - आमदार के. सी. पाडवी

यावेळी कार्यक्रमात विविध नेत्यांनी शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवत असल्याची चर्चा केली. त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माढ्याला पाठवतात की काय, असे मिश्किल वक्तव्य केले. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडीची सत्ता आल्यास सर्वप्रथम अजितदादा जेजुरीच्या २५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर पहिली सही करतील, अशी ग्वाही दिली...CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES