• A
  • A
  • A
पुण्यात दिवसभराच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद, हल्ल्यात एक जण जखमी

पुणे - शिरुर तालुक्यातील वडनेर गावात बिबट आणि नागरिक यांचा संघर्ष दिवसभर चालू असताना सायंकाळच्या सुमारास बिबट्याने साळभाऊ सिताराम निचीत या व्यक्तीला गंभीर जखमी केले. अखेर नागरिकांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.


हेही वाचा - प्रियंका गांधीनी पहिली राजकीय सभा नंदुरबारमध्ये घ्यावी - आमदार के. सी. पाडवी

शिरुर तालुक्यातील वडनेर गावातील एका शेतात बिबट्या मुक्तपणे वावरत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण होते. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकासह स्थानिक नागरिकांचे प्रयत्न केले. मात्र, बिबट्या सर्व यंत्रणेला हुलकावणी देऊन ऊसाच्या शेतात दडला होता. सायंकाळच्या सुमारास बिबट्याला ऊसाच्या शेतातून बाहेर काढण्यात आले. मात्र, पुन्हा हा बिबट्या डाळिंबाच्या बागेत शिरुन झाडावर बसला. अखेर नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले असताना बिबट्याने एका व्यक्तीच्या अंगावर झडप मारली. मात्र, जखमीने व्यक्तीने धाडस करत बिबट्याशी दोन हात करत संघर्ष केला. शेवटी जखमी अवस्थेत असताना नागरिकांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. बिबट्याला ताब्यात घेऊन निवारा केंद्र माणिकडोह येथे नेण्यात आले आहे

हेही वाचा - देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी हातभार लावावा, शरद पवारांचा सल्लाCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES