• A
  • A
  • A
देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी हातभार लावावा, शरद पवारांचा सल्ला

पुणे - दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असली तरी देवस्थान संस्थांनीही यात हातभार लावावा, असा सल्ला शदर पवार यांनी दिला. सध्या सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, अशी चिंताही पवारांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार


जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटर आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण रविवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पवार यांनी दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. आणखी काही वर्षे हिच स्थिती राहिल असा अंदाज आहे. अशा काळात देवस्थानांनी शिक्षणासारखी जबाबदारी स्वीकारावी असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'या' कारणामुळे पवारांना वाटते गडकरींची काळजी
निवडणुका येतील-जातील, पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. सध्या देशात काय सुरू आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. लोकशाहीत काहीही निकाल लागला तरी संस्थांवर हल्ले होणार नाहीत याची जबाबदारी जागृत नागरीकांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगत शरद पवार यांनी सद्यस्थितीत देशात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले.
हेही वाचा - पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठीच पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात..!
लोकशाहीत निकाल काहीही लागला तरी सरकारी संस्था टिकाव्यात ही भावना ठेवून जागृत राहणे गरजेचे असल्याचे पवार सांगत सद्यस्थितीवर भाष्य केले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES