• A
  • A
  • A
भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल, सुप्रिया सुळेंचा पलटवार

पुणे - लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. भाजपने बारामतीतून लढावे. जनता योग्य तो निर्णय करेल, मुख्यमंत्र्यांच्या बारामती लोकसभा जिंकण्याच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा - आगामी लोकसभा निवडणुकीत ४३ वे कमळ 'बारामतीत' फुलवणार - मुख्यमंत्री
पुण्यात भाजपच्या वतीने आयोजित शक्ती केंद्र संमेलनात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत बारामतीत भाजपचा उमेदवार दिला जाईल. मागच्या निवडणुकीत राज्यातून भाजपला लोकसभेच्या ४२ जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी ४३ जागा मिळतील आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना आज बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपने बारामतीत निवडणूक लढवण्यास सांगून जनता त्यांचा योग्य निर्णय करेल असा टोला लगावला आहे.पुण्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.


सरकारकडून बोलणाऱ्यांचा गळा दाबण्याचे काम-
यावेळी अभिनेते अमोल पालेकर यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमोल पालेकर यांना बोलू न देणे हे योग्य नाही. सध्या जो बोलतो त्याचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. मी पालेकर यांच्या मागे ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा - भाजपाध्यक्ष अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; लोकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES