• A
  • A
  • A
संस्थेत झालेल्या बदलांवर बोलण्यात चुकीचं काय?, 'त्या' प्रसंगावर अमोल पालेकरांचा सवाल

पुणे - रविवारी मुंबईच्या 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट'मध्ये भाषण मध्येच थांबवण्यात आल्यानंतर त्यावर आता अभिनेते अमोल पालेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार घडला त्यावेळी अध्यक्षही कार्यक्रमात हजर होत्या. त्यांनी भाषणापूर्वी माझ्याची बोलणे गरजेचे होते असे सांगितल्यावर मी भाषणाची प्रतदेखील सेन्सॉर करणार का, असा प्रतिप्रश्न केल्याचे पालेकर म्हणाले. त्यानंतर त्या कार्यक्रमस्थळावर निघून गेल्याचेही पालेकर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संध्या गोखलेदेखील उपस्थित होत्या.


शनिवारी सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांची चिकित्सा केल्याने अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले होते. कलाकार प्रभाकर बरवे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित मुंबईच्या 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट'मध्ये ते बोलत होते. एखाद्या वक्त्याने काय बोलावे काय नाही याची माहिती त्याला आधी द्यायची असते, मात्र मला तसे सांगण्यात आले नव्हते. मात्र, एनजीएमएधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांवर बोलणे हे औचित्यभंग कसे असू शकते? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली.


आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य कसे गमावले, पूर्वी आर्टच्या सल्लागार समितीत स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे, पण आता या समितीला संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेले, असे परखड मत पालेकरांनी यावेळी मांडले. मात्र, आयोजकांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवत तुम्ही बरवेंबद्दलच बोला, असे त्यांना सांगितले होते.


आयोजकांनी पालेकरांचे भाषण मध्येच थांबवल्याने, तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असा प्रश्न त्यांनी केला. यावर आम्ही तुम्हाला बरवेंबद्दल बोलण्यास निमंत्रित केलं असल्याचे आयोजकांनी म्हटलं. यावर उत्तर देत पालेकर म्हणाले, असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं. ज्यावेळी सहगल यांना महाराष्ट्रात निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्या सद्यस्थितीवर बोलणार आहेत असं आयोजकांना समजताच त्यांनी हे निमंत्रण रद्द केलं. तुम्ही तशीच परिस्थिती निर्माण करत आहात ? असा सवाल पालेकरांनी यावेळी उपस्थित केला होता.
या प्रसंगाचा दाखला देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा सरकारवर निशाणा साधला. ट्विट करून सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या आडून खेळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES