• A
  • A
  • A
कांदा संशोधन आणि निर्यातीसाठी प्रभावी योजनेची गरज - डॉ. किसन लवांडे

पुणे - कांदा बाजारभाव स्थिर करण्यासाठी संशोधन आणि निर्यातीसंदर्भात प्रभावी योजना तयार करण्याची गरज आहे, असे मत इंडियन सोसायटी ऑफ एलियम्सचे अध्यक्ष डॉ. किसन लवांडे यांनी व्यक्त केले. यशदामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'कांदा आणि लसूण उत्पादनातील आव्हाने आणि संधी' यावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी झाले. या परिषदेचे आयोजन इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स, पुणे आणि कांदा आणि लसूण संशोधन संचानालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा-मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबमुळे पुण्यातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल- मुख्यमंत्री
चार दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जपान, इस्राईल, कोरिया तसेच भारतातील सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित आहेत. एकूण ९ सत्रामध्ये कांदा व लसणाच्या विविध संशोधनात्मक विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. भारतातील तसेच परदेशातील विविध संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, पणन मंडळ तसेच खासगी कंपन्यांमधील संशोधक तसेच तज्ज्ञांनी या परिषदेत सहभाग नोंदवला आहे.
महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षात कांदा साठवण क्षमता ४ लाख टनापासून २० लाख टनापर्यंत वाढवली आहे. परंतु अजूनही ४० लाख टनापर्यंत वाढवण्याची गरज आहे. विषाणूमुक्त लसूण बियाणे निर्मिती, कांद्यासाठी साठवण आणि यांत्रिकीकरण, उत्तम प्रतीचे बियाणे उत्पादन, प्रक्रिया उद्योगांसाठी जास्त प्रमाणात विद्राव्य घन पदार्थ असणाऱ्या जातीचा विकास यावर संशोधनाची आवश्यकता आहे, असे डॉ. लवांडे यांनी यावेळी सांगितले.

डॉ. कीर्ती सिंग यांनी संकरित कांद्याच्या जाती विकसित करण्यावर भर देण्याची तसेच कांद्यासाठी संघटित मार्केट व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी कांदा व लसूण संशोधन विभागात केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याचे कौतुक केले. खरीप कांद्याचे उत्पादन शक्य असलेल्या क्षेत्रामध्ये कांदा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा-स्थलांतरितांच्या वाटेला निर्वासितांचे जगणे...मराठवाड्यातील कुटुंबे भोगतायत पुण्यात उपेक्षा
गेल्या २ दशकांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठया प्रमाणात वाढले असून, उत्पादनात भारत जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच कांदा निर्यातीतही भारत अग्रेसर आहे. कांदा उत्पादन अपारंपरिक क्षेत्रात वाढवण्यासाठी ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रयत्न केले जात आहेत. कांदा प्रक्रिया, साठवण आणि व्यापार या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगला बाजारभाव मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे डॉ ए. के. सिंग यांनी आवाहन केले.
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळी परिस्थितही कांद्याचे चांगले उत्पादन घेतात, परंतु कांद्याला बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांनी संघटित होऊन केलेल्या अखिल भारतीय निर्यातदार संघटनांसारख्या शेतकरी संघटना उभारण्याची गरज असल्याचे डॉ. के.पी. विश्वनाथ यांनी सांगितले.

संचनालयालाचे नामकरण आता राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था, असे करण्यात येणार असून संस्थेवर महत्त्वाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांसाठी संस्थेने ९ कांद्याच्या जाती २ लसणाच्या जाती तसेच साठवण गृह आणि खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून, संस्थेच्या स्थापनेपासून भारतातही कांदा उत्पादकता जवळपास दुपटीने वाढली आहे असे, डॉ. मेजर सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा-भरारी! जमीर शेख भारतीय वनसेवा परीक्षेत राज्यात पहिलाCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES