• A
  • A
  • A
मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबमुळे पुण्यातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल- मुख्यमंत्री

पुणे - “स्मार्ट मोबिलिटीसाठी राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ई-बस, मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि ऑफिस राईड ऍप्लिकेशन अशा प्रकल्पांमुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसह इतर समस्या दूर होण्यास मदत होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सणस मैदानावर झाले. यावेळी ते बोलत होते. स्मार्ट इलेक्ट्रिक बसच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण १५० इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ मीटर लांबीच्या नॉन-बीआरटी २५ एसी इलेक्ट्रिक बस, १२ मीटर लांबीच्या १२५ बीआरटी एसी इलेक्ट्रिक बस असतील. पहिल्या टप्प्यातील २५ बसची खरेदी करण्यात आली असून त्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
वाचा- रखडलेला विकास पूर्ण करायचा असेल तर गोंदिया मध्यप्रदेशला जोडा - कमलनाथ
इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी पुणे स्मार्ट सिटी 'पीएमपीएमएल’सोबत काम करीत आहे. पुणे स्मार्ट सिटी प्लॅननुसार इलेक्ट्रिक बसच्या खरेदीसाठी तसेच चार्जिंगसारख्या पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

वाचा- अक्षम्य बेपर्वाई.. ऑपरेशननंतर महिलेच्या पोटातच कात्री विसरले डॉक्टर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES