• A
  • A
  • A
भरारी! जमीर शेख भारतीय वनसेवा परीक्षेत राज्यात पहिला

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या भारतीय वनसेवा म्हणजेच आयएफएस परीक्षेत पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील जमीर मुनीर शेखने घवघवीत यश मिळवले आहे. त्याने राज्यातून पहिला तर देशात १८ वा क्रमांक मिळवला आहे. जमीर याच्या यशामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जमीर शेख


जमीरने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी. टेकची पदवी घेतली. ही पदवी घेत असताना जमीरचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच होता. स्पर्धा परीक्षा देत असताना यश अवघ्या काही गुणांनी तुम्हाला हुलकावणी देते. त्यामुळे जमीर शेख विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देतो. ही परीक्षा देताना स्वतःची शिस्त आणि आत्मविश्वास या दोनच गोष्टी तुम्हाला यशापर्यंत नेतात, असा जमीर याचा सल्ला आहे.
हेही वाचा - राजगुरूनगरमध्ये सैनिक भरती करणाऱ्या तरुणांचा विराट मोर्चा
पुणे नगर महामार्गावरुन जाताना शिरुर शहर लागते. या शहरात सामान्य कुटुंबात राहाणाऱया जमीरने हा यशाचा डोंगर पार केला आहे. तब्बल तीन वेळा स्पर्धा परीक्षेतील यशाने जमीरला हुलकावणी दिली. मात्र, जमीर स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिला. अखेर तिसऱ्या प्रयत्नांमध्ये यश मिळाले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याची केवळ एक संधी हातात उरलेली असताना जेव्हा घवघवीत यश मिळते, तेव्हा कसा आनंद होतो, त्याचा अनुभव जमीर मुनीर शेख घेत आहे.
स्पर्धा परिक्षांची तयारी करत असताना अभ्यासाची एक शिस्त आत्मसात करण्याची गरज आहे. तुम्ही जेव्हा एक प्रशासकीय अधिकारी होता, तेव्हा तुमच्याकडून समोरच्या लोकांच्या खूप अपेक्षा असतात आणि त्या वेळेतच पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे प्रत्येकाने अभ्यासाचे नियोजन करण्याची गरज आहे. त्याचे एक उदाहरण माझ्या रुपाने समोर आहे. स्वतःचे एक लक्ष्य असेल तर मेंदू आपोआप काम करायला लागतो. मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासोबतच शरिराची काळजीही घेतली पाहिजे. याशिवाय सर्वात मोठी उर्जा म्हणजे सकारात्मकता. तिच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असाही सल्ला यावेळी जमीर याने दिला.
हेही वाचा - राहुल बाबा आणि कंपनीने ५५ वर्षात देश खड्ड्यात घातला - अमित शाह
जमीर शेख याला अनेकदा काही गुणांनी यशाच्या शिखरावर जाण्यासाठी हुलकावणी मिळत होती. त्यामुळे त्याने दिल्लीहून बंगळुरूला अभ्यासासाठी जाण्याचे ठरवले. बंगळुरात त्याला अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच यशाचे शिखर गाठण्याचा संकल्प केला आणि आता तो संकल्प प्रत्यक्षात आला, याचा आनंद माझ्यासह कुटुंबातील प्रत्येकाला झाला असल्याचे जमीरने सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES