• A
  • A
  • A
राजगुरूनगरमध्ये सैनिक भरती करणाऱ्या तरुणांचा विराट मोर्चा

पुणे - सरकारने पोलीस भरतीत काही बदल केले आहेत. याचा फटका भरतीची तयारी करणाऱया तरुणांना बसणार आहे. यामुळे राजगुरूंच्या भूमीत आज सैन्य आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला.


हेही वाचा - पुणतांब्यातील मुलींचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, ग्रामस्थांचा आरोप
राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अचानक बदल करून काही नवीन नियम तयार केले आहेत. पूर्वी शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर एकूण उपलब्ध जागेपैकी १.१५ या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी मुले पात्र ठरवण्यात येत होती. तसेच १०० गुणांची लेखी परीक्षा घेऊन शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा यांचे गुण एकत्र करत अंतिम यादी तयार केली होती. मात्र, राज्य सरकारने पोलीस शिपाई सेवा परीक्षा २०१९ नुसार पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर १.५ याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये मुले प्राप्त ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे शारीरिक क्षमता चाचणी ५० गुणांची होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलीस दलात शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची उपलब्धता होण्याबाबत शक्यता कमी आहे, अशी शंका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. हा निकष परीक्षेच्या अगदी तोंडावर घेतल्याने वर्षानुवर्षे तयारी करत असणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा - आंबेडकर बंधूंच्या विद्यार्थी संघटना मुंबई विद्यापीठाविरोधात आक्रमक
राज्य सरकारने नव्याने तयार केलेल्या नियमावलीत बदल केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण आणि डोंगराळ भागातील तरुण चिंतीत आहे. हे तरुण मोठ्या मेहनतीने सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत असताना सरकारच्या नवीन नियमावलीचा या विद्यार्थ्यांच्या मेहनतींवर पाणी सोडले आहे, अशी भावना भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी व्यक्त केली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES