• A
  • A
  • A
महाराष्ट्रातील मोठ-मोठी घराणी भाजपच्या संपर्कात, रोज १ घराणे येणार सोबत - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - महाराष्ट्रातील मोठ-मोठी राजकीय घराणी भाजपच्या संपर्कात आहेत. रोज एक-एक घराणे भाजपसोबत येईल. तसेच येत्या २ दिवसात उत्तर महाराष्ट्रातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.


बाळासाहेब ठाकरे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ नेहमी कोल्हापुरातून करायचे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही युतीचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी येत्या २४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - 'शरद पवारांना फक्त शिवसेना-भाजपात घेऊ नका, मग आम्ही टीका करायची कोणावर ?'
राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक परम मित्र आहेत, तर भाजपचे आमदार अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे भाऊ आहेत. एवढेच नाहीतर भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक धनंजयच्या भाऊजाई आहेत. त्यामुळे तिघेही भाजपचे खंदे कार्यकर्ते असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा - राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवारच लोकसभेच्या रिंगणात
समोर नातेवाईक उभा असताना युती धर्म पाळत युतीच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. त्यामुळे मनात दुःख आहे. मात्र, मोदींसाठी एक मत देणाऱ्या खासदाराला निवडून द्यायचे आहे, असे म्हणत युती धर्म पाळण्याचे संकेत पाटील यांनी यावेळी दिलेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES