• A
  • A
  • A
निवडून येऊन चूक केली म्हणून त्यांनी मतदारांचीच मागावी माफी; मंडलिकांचा खासदारांना टोला

कोल्हापूर - माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी काय केले हे पाहिले पाहिजे. कालच विद्यमान खासदारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. त्यांनी मतदारांची माफी मागितली पाहिजे, की मी निवडून येऊन चूक केली आणि तुमचे कोणतेच प्रश्न मी सोडवू शकलो नाही. तरच त्या माफीला अर्थ असल्याची टीका कोल्हापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता लगावला.


लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वेगाने वाहू लागले आहे. कोल्हापुरात सुद्धा युती आणि आघाडीकडून संपूर्ण मतदारसंघात दौरे सुरू आहेत. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ २४ मार्चला कोल्हापूरातून होणार असल्याने त्याची तयारी सुरू आहे. तर आघाडीच्याही प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच होणार आहे. आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक यांची पक्षाकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. खासदार महाडिक यांनी वेळोवेळी मंडलिक यांना १२ वाजता उठतात अशा प्रकारचे आरोप केले. त्यावर उत्तर देताना मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली ते म्हणाले, खासदार गुळगुळीत झालेले कॅसेट परत-परत लावत आहेत. 'खोटं बोल पण रेटून बोल' असे ते गेले अनेक दिवस झाले करत आहेत. खरंतर खासदारच आता 'नॉट रीचेबल' असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतः काय केले हे पाहावे. ते म्हणाले, कालच खासदारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. पण त्यांनी त्यांची माफी न मागता मतदारांची माफी मागितली पाहिजे, की मी निवडून येऊन चूक केली आणि तुमचे कोणतेच प्रश्न मी सोडवू शकलो नाही. तरच त्या माफी मागण्याला अर्थ असल्याची टीका सुद्धा मंडलिक यांनी खासदारांवर केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES