• A
  • A
  • A
'त्याने' आईच्या निधनानंतर केली पत्नीची हत्या, रचला असा बनाव

कोल्हापूर - शहरात सासूच्या निधनाच्या धक्क्याने सूनेने आत्महत्या केल्याची घटना ९ मार्चला उघडकीस आली होती. मात्र, सुनेने केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून खून असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. शनिवारी कोल्हापूरच्या आपटेनगरमध्ये सुनेने आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने रचला होता. परंतु, पोलीसी खाक्या दाखवताच पतीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे.

आरोपी संदीप लोखंडे


आईच्या निधनामुळे पत्नीने आनंद व्यक्त केल्याने तिची हत्या केली असल्याची कबुली आज पती संदीप लोखंडे यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे सासूच्या निधनाच्या धक्क्याने सुनेने आत्महत्या केल्याची घटना खरी नसून तो फक्त बनाव होता, हे समोर आले आहे. पती संदीप लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मुळचे सांगली जिल्ह्यातील बागणीचे संतोष लोखंडे आणि त्यांचे कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापुरातील आपटेनगर येथील घरात राहत होते. शनिवारी पहाटे संतोष लोखंडे यांची आई मालती यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर घरामध्ये वातावरण शांत झाले. मालती यांच्या मृतदेहाजवळ पती मधूकर आणि त्यांचा मुलगा संदीप बसून होते. मात्र, आईच्या निधनाचा आनंद पत्नी शुभांगी यांच्या चेहऱ्यावर दिसल्याने रागात तिची हत्या केली असल्याची कबुली आज पती संदीप लोखंडे यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

सासूच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केली असावी असे संतोष लोखंडे यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच संतोष लोखंडेने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगत पत्नीचा खून मी स्वतः केल्याची कबुली दिली असल्याची महिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. शिवाय संशयित आरोपी संतोष लोखंडे याला सुद्धा अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES