• A
  • A
  • A
सभेला गर्दी झाली नाही तर पदच काढून घेईन - रामदास आठवले

कोल्हापूर - नेहमीच आपल्या चारोळ्यांमुळे चर्चेत असलेले मंत्री रामदास आठवले आज मात्र कडक भूमिकेत कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकार परिषद सुरू असताना बेशिस्त वागणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच खडसावले. जर सभेला गर्दी झाली नाही तर पदच काढून घेईन, अस दमच त्यांनी यावेळी या बेशिस्त कार्यकर्त्यांना दिला आहे.


हेही वाचा-'सेना- भाजप एकत्र आले, 'आठवले' नाव असतानाही मला विसरले'
पत्रकार परिषद सुरू असताना कार्यकर्ते मागे चुळबुळ करत होते. त्यावेळी संतापलेल्या आठवलेंनी त्यांना हा दम दिला. एवढेच नाही तर शेजारी बसलेल्या रिपाईंचे पदाधिकारी शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे यांना देखील त्यांनी झापले. पत्रकार परिषद सुरू असताना कार्यकर्ते कशाला? मला कधी पाहिले नाही का ? असे म्हणत कार्यकर्त्यांना थोडी शिस्त लावा, असेही खडसावून सांगितले.
हेही वाचा-कोल्हापुरात १ कोटींचा गुटखा जप्त; आजवरची सर्वात मोठी कारवाई

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES