• A
  • A
  • A
वडाप गाडी उलटली; एक प्रवासी ठार, १२ जण जखमी

कोल्हापूर - वडाप गाडीला झालेल्या अपघातात एक प्रवासी जागीच ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कात्यायनी घाटात आज सायंकाळी घडली. जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या कात्यायनी घाटात वडाप गाडी पलटी झाली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून जखमींमध्ये पुरुष आणि महिलांचाही समावेश आहे. मृताचे नाव अद्याप समजू शकले नाही. सर्व जखमींना तात्काळ कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; एक शेळी केली फस्त

वडाप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी करवीर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि इस्पूरली पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. या मार्गावरील अपघातग्रस्त गाडी बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES